नंदूरबार: आश्रम शाळेत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, संतप्त गावकर्‍यांचा जिल्हाधिकार्‍यांवर हल्ला

 

रायगड माझा  वृत्त 

नंदूरबार- सलसाडी शासकिय आश्रम शाळेतील विद्यार्थ्याचा शॉक लागून सोमवारी मृत्यू झाला आहे. सचिन चंद्रसिंग मोरे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सचिन पाचव्या इयत्तेत शिक्षण घेत होता. या घटनेनंतर गावकरी आणि पालक संतप्त झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच आश्रम शाळेत पाहाणी करण्‍यासाठी गेलेले सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा आणि तहसीलदार योगेश चंद्रे यांना संतप्त गावकर्‍यांनी मारहाण केली. यात

विनय गौडा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत