नऊ महिन्यांपासून बंद असलेली मोनो रेल उद्यापासून पुन्हा ट्रॅकवर

मुंबई : रायगड माझा वृत्त 

Image result for mono rail mumbai

आग लागल्यामुळे नऊ महिन्यांपासून बंद असलेली मोनो रेल शनिवारपासून पुन्हा ट्रॅकवर येणार आहे. वडाळा आणि चेंबूर या स्थानकांवरून दोन्ही दिशांकडे पहिली मोनो रवाना होईल. रात्री १० पर्यंत ही सेवा सुरू असेल. दर १५ मिनिटाला मोनो रेल सुटणार असून, दिवसभरात १३० फेऱ्या असतील.

चेंबूर-वडाळा या पहिल्या टप्प्यातील मोनोच्या डब्याला ९ नोव्हेंबर २०१७ रोजी पहाटे आग लागली होती. या आगीमध्ये जीवितहानी झाली नव्हती; मात्र  मोनोचे डबे खाक झाले होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करून मोनो पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ सप्टेंबरपासून मोनो धावणार आहे. मोनोची शेवटची फेरी वडाळा आणि चेंबूर या स्थानकांवरून रात्री अनुक्रमे ९.५३ आणि १०.०८ वाजता सुटणार आहे. दरम्यान, चेंबूर ते वडाळा या स्थानकांदरम्यानची मोनो ट्रॅकवर येणार आहे; मात्र वडाळा ते जेकब सर्कल हा दुसरा टप्पा कधी सुरू होणार, हे एमएमआरडीएने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत