नगरपंचायतीसाठी पालीकरांचा  ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

पाली : रायगड माझा वृत्त

सुधागड तालुक्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या पालीग्रामपंचायतीची निवडणुक रविवारी २७ मे ला  होणार होती.पाली  या निवडणुकीला नाट्यमय वळण मिळाले असून आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या दिवशी नामांकन दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी आपले  उमेदवारी अर्ज मार्ग घेतले. पाली ला नगर पंचायत व्हावी यासाठी  निवडणुकीवर हा सर्वपक्षीय बहिष्कार असल्याचे  बोलले जात आहे. पालीच्या विकासासाठी नगरपंचायत व्हावी ही सर्व पालीकरांची इच्छा आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याचे सर्व पक्षाच्या नेत्यांनी व उमेदवारांनी सांगितले.पालीच्या इतिहासात अशा प्रकारे सर्वपक्षियांनी एकत्रीत येवून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पाली गावाच्या उज्वल भवितव्यासाठी व पालीच्या सर्वांगिण विकासासाठी पालीकर जनतेसह सर्वपक्षीयांनी पाली नगरपंचायत व्हावी असे वाटत होते. त्यामुळे पाली ग्रामपंचायतीसाठी होणार्‍या निवडणुक प्रक्रीयेवर बहिष्कार टाकण्याचे पालीत सोमवारी  ३० एप्रिल ला सायंकाळी झालेल्या सर्वपक्षिय नेते, कार्यकर्ते व पालीकर नागरीक यांच्या बैठकीत ठरले. त्यानुसार गुरुवारी.३ मे रोजी  पाली तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र या बहिष्कारापासून शिवसेना हा एकमेव पक्ष अलिप्त राहिला होता.

यामुळे ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवूनही उमेदवारी अर्ज भरण्यात आले. पाली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ५८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यापैकी ५४ सदस्य तर 4 सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परिणामी सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम वाढला होता. मात्र यामागील व्युहरचना मात्र वेगळी होती. त्यानुसार शिवसेनेला बरोबर घेवून रविवारी  सर्व पक्षियांनी अपक्षांसह बैठक घेवून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा एकमुखी निर्णय घेतला. त्यानुसार आज हे  उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाली ग्रामपंचायत निवडणुकीला अलविदा करीत शिवसेनेसह सर्व पक्षिय व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. अाणि ही संभ्रमावस्था संपुष्टात आली.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत