नगर-पुणे महामार्गावर मराठ्यांचा ठिय्या..राधाकृष्ण विखे पाटीलही उतरले रस्त्यावर

शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ नगर-पुणे महामार्गावर ठिय्या मांडला आहे.
Maharashtra Bandh for Maratha reservation Live Updates Ahmednagar

अहमदनगर- शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ नगर-पुणे महामार्गावर ठिय्या मांडला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलन शांततेत शिस्तबद्धपणे सुरू आहे. ठिय्या आंदोलनाच्या आधी चौकात राष्ट्रगीत झाले. एसटी महामंडळाच्या बस बंद आहेत. तसेच शाळा-महाविद्यालयांना अघोषित सुटी आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.