नगर : महापौर व उपमहापौर पदासाठी २८ डिसेंबरला होणार निवडणूक!

नगर : रायगड माझा वृत्त

महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी विभागीय आयुक्तांकडून तारीख निश्‍चित झाली असून येत्या २८ डिसेंबरला या दोन्ही पदांसाठी निवडणूक होणार आहे. या संदर्भात बुधवारी (दि.१९) महापालिकेला अधिकृतपणे पत्र प्राप्त झाले आहे. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना प्राधिकृत केले आहे.

महापालिकेचा निकाल शासनाच्या राजपत्रात प्रसिध्दात प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासनाने तात्काळ महापौर व उपमहापौर निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार २८ डिसेंबरला सकाळी ११ वाजता निवडणूक होणार आहे. निवडणूक कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर होणार आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांकडूनही सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. शिवसेना, भाजप व कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी गटनोंदणीही केली आहे.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत