‘नथुराम, गोळवलकरांना सोडा; मग जरूर गांधींना स्वीकारा’

पुणे : रायगड माझा वृत्त 

भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेससह सर्वच पक्ष गांधीवादाला मिठी मारत आहेत. भाजपला गांधी अधिक जवळचे वाटू लागले आहेत. भाजपने जरूर गांधींना स्वीकारावे; पण त्यासाठी नथुराम आणि गोळवलकर यांना सोडले पाहिजे. गांधींचे औदार्य आणि उदार हिंदुत्वाची बेरीज करता आली, तर आपले राजकारण आणि समाजकारण शुद्धतेच्या पातळीवर जाईल, असे मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

Frist release Nathuram and Golwalkars Then definitely accept Gandhi says Shripal Sabnis

“लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरीचे इहवादी मूल्यमापन’ आणि “आंबेडकरवादी प्रतिभावंत’ या डॉ. सबनीस लिखित पुस्तकांचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार वंदना चव्हाण, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. डी. वाय. पाटील, डॉ. रतनलाल सोनाग्रा, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट, अरविंद चाफळकर, सचिन इटकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

झोपडपट्टी, कामगार आणि दलितांच्या समस्या सोडून निर्माण झालेले साहित्य वांझ आहे. त्याला साहित्य म्हणता येणार नाही, असे सांगताना डॉ. सबनीस म्हणाले, “”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि अण्णा भाऊ साठे यांचा विचार वजाबाकीत विभागला गेला आहे. तो एकत्रित करण्याचा प्रयत्न दोन पुस्तकांच्या माध्यमातून केला आहे.”

शिंदे म्हणाले, “”सर्वंकष दलित चळवळ उभी राहिली पाहिजे, त्यात सर्व जातीचे लोक एकत्र यायला पाहिजे. असा नवा समाज घडविण्यासाठी डॉ. सबनीस यांनी क्रांतिकारी विचार या पुस्तकांतून दिला.

शरद पवार यांनी फकिरा या कांदबरीतील मर्म उलगडून सांगत अण्णा भाऊ साठे यांचा खडतर जीवन प्रवास विषद केला. त्यांना शिक्षण घेता आले नाही. पण, लेखणी हाती घेऊन प्रचंड साहित्य त्यांनी निर्माण केले. ईश्‍वर असेल, तर तो सर्वांसाठी समान आहे, हे सूत्र संतांनी मांडले. या विचारांना गती आली ती महात्मा फुले यांच्यामुळे. डॉ. आंबडेकर यांनीही उपेक्षित समाजातील तरुणांना ज्ञान घेण्याचा संदेश दिला. त्यामुळे अनेकांनी लेखणी हातात घेतली, असे त्यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत