नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी औरंगाबादच्या सचिन अंदुरेला CBI कडून अटक

 

रायगड माझा वृत्त 

औरंगाबाद- डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी (सीबीआय) एका हल्लेखोराला अटक केली आहे. सचिन प्रकाशराव अंदुरे असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव असून तो औरंगाबाद येथील रहिवासी आहे. जालन्यातूनही एकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

सचिन अंधुरे याला औरंगाबाद येथून 14 तारखेला रात्री अटक करण्यात आली. सचिन अंधुरेला एक मोठा भाऊ आहे. तो विवाहित आहे त्याला 2 मुले आहेत. औरंगाबादेतील रोजा बझार भागातील तो रहिवासी आहे. तो निराला बझारमध्ये एका कापड दुकानात काम करत होता.

अधिकृत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दाभोलकरांच्या हत्येत सचिन अंदुरे याचा सहभाग होता. दाभोलकरांवर गोळी झाडणार्‍या दोन शूटरपैकी सचिन एक असल्याचे सांगितले जात आहे. एटीएसद्वारा दक्षिणपंथी हिंदु संगघटनेच्या सदस्यांच्या चौकशीत शूटर सचिन अंदुरेचे नाव समोर आले. सचिन अंदुरे याने चोरी केलेल्या दुचाकीचा वापर करून दाभोलकरांची हत्या घडवून आणली. एटीएसने चौकशीतून समोर आलेली माहिती सीबीआयला दिली. या माहितीच्या आधारे सीबीआईने औरंगाबादेतून आरोपीला शनिवारी अटक केली.

शरद कळसकर याने केली दाभोलकरांची हत्या?
नालासोपरा येथे सापडलेल्या स्फोटकप्रकरणी अटकेत असलेल्या शरद कळसकर याने डॉ.दाभोलकरांच्या हत्येची कबुली दिल्याची माहिती मिळाली आहे. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी डॉ. दाभोरकर यांची गोळी झाडून हत्या केल्याची माहिती केली आहे.

20 ऑगस्ट 2013 रोजी झाली होती डॉ. दाभोलकरांची हत्या
20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत