नरेंद्र मोदी ‘डरपोक’, माझ्या समोर ते 10 मिनिटेही टिकणार नाहीत : राहुल गांधी

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

नरेंद्र मोदी 'डरपोक', माझ्या समोर ते 10 मिनिटेही टिकणार नाहीत - राहुल गांधी

निवडणुका जशा जवळ येताहेत तसा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींचा जोश वाढतोय. गुरुवारी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या मेळाव्यात त्यांनी जोरदार भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. पंतप्रधन मोदी हे डरपोक नेते आहेत असा आरोप त्यांन केला. मोदींनी देशाची वाट लावली असंही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या भाषणात टार्गेट केलं. मोदींना कुठलंही धोरण नाही, नोटबंदी लावून त्यांनी गरीबांना रांगेत उभे केलं. रोजगार हिरावून घेतला.

ते प्रमाणिक नसल्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून ते बोलू शकत नाही अशी टीका त्यांनी केली. मोदींना माझ्य समोर चर्चेला आणलं तर ते 10 मिनिटेही बोलू शकणार नाहीत. स्टेजवरून पळून जातील असंही ते म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत