नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11वे अवतार! भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी तोडले तारे

मुंबई : रायगड माझा वृत्त 

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्याची शर्यत सुरू आहे. त्यात आता भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांची भर पडली आहे. नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11वे अवतार आहेत, असे ट्विट करत त्यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.
आपल्या ट्विटचे स्पष्टीकरण देताना वाघ म्हणाले, ‘हिंदू संस्कृतीत 33 कोटी देव आहेत. पंचमहाभूते आहेत. भारतमातेला आपण देव मानतो. अगदी त्याचप्रमाणे मोदी हे देशाचे प्रधानसेवक असून ते भारतमातेची सेवा ज्या प्रकारे करत आहेत त्यामुळे आमच्यासाठी ते देवासमानच आहेत. त्या भावनेतून मी त्यांना विष्णूचा 11वा अवतार मानतो.’

‘प्रभू रामचंद्राने जन्म घेतला होता तो जगाच्या कल्याणासाठी. त्यासाठी त्यांनी रामराज्य आणले. कृष्णानेही देवकीच्या पोटी जन्म घेतला होता. त्या धर्तीवर मी त्यांना देव मानतो,’असेही वाघ म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत