नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी घेतली आमदार सुरेश लाड यांची कर्जत मध्ये भेट

कर्जत- संजय गायकवाड
कोकण मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांनी आज दि.26 मे रोजी दुपारी आमदार सुरेश लाड व मतदार यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले तर आमदार सुरेश लाड यांनी अनिकेत तटकरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोकण मतदार संघात विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार अनिकेत तटकरे यांचे आज  दुपारी कर्जत नगरीत आगमन झाले. दहीवली येथील राष्ट्रवादी भवन त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आमदार सुरेश लाड यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी तानाजी चव्हाण, भगवान भोईर, एकनाथ धुळे, अशोक भोपतराव, नरेश मसणे,  शरद लाड, भास्कर दिसले, नगराध्यक्षा रजनी गायकवाड, राजेश लाड, उमेश गायकवाड,  आदी सह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार अनिकेत तटकरे यांनी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपला विजय झाला आहे असे नमूद करून सर्वांचे आभार मानले.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत