नवऱ्याने आधी बायकोवर बलात्कार केला, नंतर तिच्यासोबत जे केले ते धक्कादायक होते

ठाणे: रायगड माझा 

अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवऱ्यानेच बायकोवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना शहापूर येथे सोमवारी रात्री घडली. सुनिता (40) शेळके असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलीसांनी अरोपी पती संतोष शेळके (45) याला अटक केली आहे.

पोलीसांनुसार, शहापूर तालुक्यातील बिरवाडी गावामध्ये हे जोडपे राहत होते. संतोष बेरोजगार होता आणि त्याला मद्यपान करण्याची सवय होती. पत्नी सुनिता मिलमध्ये नोकरीला होती. सुनिताचे कामावर परपुरूषासोबत अनैतिक संबंध असल्याचा संतोषला संशय होता. या करणावरून त्यांच्यात अनेकवेळा वाद देखील होत होता. सोमवारी सुनिता कामावरून परतली, तेव्हा संतोष तिला निर्जन स्थळी घेऊन गेला आणि तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध बनवले आणि ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली.

हा बलात्कार दुसऱ्याने केला असे भासवण्यासाठी संतोषने काचेची बाटली फोडून मृत सुनिताच्या शरीरावर घाव केले. यानंतर संतोष घरी परतला. रात्र झाली तरी पत्नी घरी आली नाही त्यामुळे आपण अतिशय चिंतेत आहोत असे त्याने शेजाऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्थानिकांनी सुनिताची शोधाशोध केली तेव्हा एका नाल्याजवळ तिचा मृतदेह आढळून आला. यानंतर घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना संतोषवर संशय आला. त्यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत