नवऱ्यासोबत भांडण झाल्याने मुलाची हत्या करून बायकोची आत्महत्या

 मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Related image

नवऱ्यासोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात एका महिलेने तिच्या तीन वर्षाच्या मुलाची हत्या करत स्वत: देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कुर्ला येथे घडली आहे. अनुजा वंजारी असे त्या महिलेचे नाव असून तिचे सोमवारी एका लग्नसमारंभात नवऱ्यासोबत भांडण झाले होते. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नसून मुलीच्या पालकांची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

अनुजा वंजारी ही तिच्या कुटुंबासोबत कुर्ला येथील व्हीबी नगरमधील गुरुदत्त सोसायटीत राहयची. मंगळवारी सासू व नवरा कामावर गेल्यानंतर अनुजा व तिचा तीन वर्षाचा मुलगा दोघेच घरात होते. त्यावेली तिने ओढणीने श्रीचा गळा घोटला व त्याची हत्या केली. त्यानंतर तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी अनुजाची सासू घरी परतल्यानंतर तिने दरवाजा ठोठावला मात्र अनुजा दरवाजा उघडत नसल्याने शेजारच्या एका तरुणाने दुसऱ्या घराच्या खिडकीतून अनुजाच्या घराच्या खिडकीत उडी घेतली. तेव्हा त्याला अनुजा पंख्याला लटकलेली आढळली. तर श्री हा झोपला असल्यासारखे वाटले. त्याने याबाबत अनुजाच्या सासूला सांगितले. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा अनुजाने श्री ची देखील हत्या केल्याचे समजले.

याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. अनुजाचे पालक सोलापूर मधील करमाळा येथे राहतात. ते आल्यानंतर त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत