नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे दर घसरले

नवी मुंबई : रायगड माझा वृत्त 

नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये आज 700 गाड्यांची आवक झालेय. अचानक 200 गाड्यांनी आवक वाढल्याने याचा परिणाम भाजीपाल्याच्या किमतींवर झाला आहे.

भाजीपाल्याच्या किमती आज तब्बल 50 टक्क्यांनी घटल्याच समोर आलं आहे. आज महाराष्ट्रासोबतच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या परराज्यातूनही भाजीपाल्याची आवक जास्त आल्याने वांगी, दुधी, कोबी, फ्लॉवर, मटार या भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. पावसाळ्यानंतर काही महिने भाज्यांची आवक ही नेहमीच जास्त असते. त्यामुळे येते 2 ते 3 महिने भाज्यांचे दर असेच कमी राहणार असल्याने सामान्य नागरिकांना ही नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.

भाज्यांचे आजचे व दोन आठवड्या पूर्वीचे दर किलो नुसार खालील प्रमाणे

 • भेंडी- आज 20रु पूर्वी 30रु
 • फरसबी – आज 12रु पूर्वी 24रु
 • वांगी- आज 20रु पूर्वी 30रु
 • टोमॅटो- आज 5 ते 6रु पूर्वी 8रु
 • वाटाणा ( मटार) – आज 45रु पूर्वी 70रु
 • सिमला – आज 10 ते 12रु पूर्वी 16 ते 18रु
 • कारलं- आज 14रु पूर्वी 18 ते 20रु
 • कोबी – आज 3रु पूर्वी 5रु
 • दुधी – आज 7रु पूर्वी 10रु
 • आलं – आज 50रु पूर्वी 80रु
 • हिरवी मिरची – आज 14 ते 16 पूर्वी 20 ते 24रु

 पालेभाजी 

 • मेथी –  आज 10रु पूर्वी 10रु
 • पालक – आज 6रु पूर्वी 8रु
 • कोथींबीर – आज 10रु पूर्वी 10रु
 • कांदापात – आज 10रु पूर्वी 10 रु
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत