नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल!

नवी मुंबई : रायगड माझा वृत्त 

नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फार्म हाऊसवर नेऊन नामदेव भगत यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप 19 वर्षीय तरुणीने केला आहे.

नामदेव भगत यांची कामानिमित्त भेट घेण्यासाठी आपण उरण तालुक्यात असलेल्या दिघोडेमधील फार्म हाऊसवर गेलो होतो. मात्र तिथे गेल्यावर त्यांनी विनयभंग केल्याचा आरोप 19 वर्षीय तक्रारदार तरुणीने केला आहे.

नामदेव भगत हे नवी मुंबईतील नेरुळमधून शिवसेनेचे नगरसेवक असून स्थायी समिती सदस्य आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी सिडको संचालकपदही सांभाळलं होतं.पोलिसांनी नामदेव भगत यांच्याविरोधात कलम 354 अन्वये गुन्हा दाखल केला आहे, मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत