नवी मुंबईत इंटरनेट सेवा बंद ; मराठा आरक्षण आंदोलन

नवी मुंबई : रायगड माझा वृत्त 

काल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणावर जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर सुरक्षेच्या कारणस्तव काल मध्यरात्रीपासून दोन दिवसांसाठी इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. औरंगाबादपाठोपाठ नवी मुंबईतही आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामुळे पोलिसांनी इंटरनेटसेवा बंद करण्याचा निर्णय बुधवारी रात्री ८ वाजता घेतला. तसेच आज दहा वाजता पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी कोपरखैराने येथे स्थानिकांची बैठक घेतली.

आंदोलनामध्ये कळंबोली येथे ४  वाहने, कोपरखैराने येथे पोलिस चौकीसह ७ दुचाकी, २ वाहने जाळण्यात आली. यामध्ये पोलिसांच्या वाहनाचाही समावेश होता. जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत चार पोलिस जखमी झाले. यात २ पोलिस उपायुक्त तर एका पोलिस निरीक्षकासह कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

कोपरखैराने येथे पुन्हा वाद होवून कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि अफवा पसरु नयेत यासाठी पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी काल रात्री ८च्या सुमारास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी इंटरनेटसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला.

मोबाईलवर डेटा ऑन केल्यानंतरही मेसेजेस किंवा नेटवर्क मिळत नसल्याचे दिसल्यानंतर इंटरनेट बंद केले असल्याचे समजले. यामुळे डिजीटल पेमेंट करणे अडचणीचे बनले आहे. पेट्रोलपंपावर रोख व्यवहार करावे लागत असल्याने लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत