नवी मुंबईत तिहेरी हत्याकांड

नवी मुंबई: विकास मिरगणे

नवी मुंबई मध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. हत्या झालेले तिन्ही तरुण भंगार व्यवसायात होते. तुर्भे एमआयडीसी मध्ये ही तिहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे.

हत्या झालेले तरुण भंगार व्यावसायिक होते . तुर्भे एमआयडीसी एका बंद कंपनी मध्ये तिघांचे भंगाराचे दुकान होते. चार लाखाच्या भंगरविक्रीतून ही तिहेरी हत्या झाल्याचे समजतेय..तीक्ष्ण हत्याराने तरुणांच्या डोक्यात आणि पोटावर वार करण्यात आले आहेत. मध्य रात्री हि घटना घडली. इर्शाद वय २०वर्ष नौशाद वय १७ वर्ष राजेश वय २८ वर्ष अशी हत्या झालेल्या तरुणांची नावे आहेत. नवी मुंबईला हादरवून टाकणाऱ्या हा प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत