नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात अपहरणाचा गुन्हा

नवी मुंबई : रायगड माझा वृत्त

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुनावर पटेल यांच्याविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हे राजकीय षडयंत्र असून लोकप्रियता वाढत असल्याने हे कारस्थान रचण्यात आले, असा दावा मुनावर पटेल यांनी केला आहे.

मुनावर पटेल हे नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक ५५ चे नगरसेवक आहेत. २ नोव्हेंबर रोजी खैरणे गावात सुफियना शेख या रिक्षाचालकाची पटेल यांच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली. यानंतर कार्यकर्त्यांनी मारहाण करत पटेल यांच्या कार्यालयात नेले आणि तिथेही मला मारहाण करण्यात आली, असे रिक्षाचालकाने म्हटले आहे. रिक्षाचालकाने या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. शेवटी त्यांनी या प्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली.पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर कोपरखैरणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोपरखैरणे पोलिसांनी रिक्षाचालकाचे आरोप फेटाळून लावले. ‘सर्वांची योग्य ती दखल घेतली जात असून गुन्हा नोंद करा वा करू नका असा कुठलाही दबाव आणला जात नाही’, असा दावा केला. या प्रकरणी नगरसेवक मुनावर पटेल यांनी माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत चांगल्या कामाने मिळणारी लोकप्रियतेमुळे हे कारस्थान रचण्यात आल्याचा दावा केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत