नवी मुंबईला हवा प्रदूषणाचा विळखा

महाराष्ट्र News 24

तळोजा, खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेल वसाहतीमधील नागरिक रात्रीच्या वेळी हवेत सोडणाऱ्या वायू प्रदूषणामुळे रहिवासीयांना त्रास होत असल्यामुळे अनेक संस्था, राजकीय व्यक्तीने महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे लेखी तक्रारी केल्यास तात्पुरत्या स्वरूपात कारवाई केली जाते. कारवाई होताच तीन चार दिवस हे प्रमाण कमी होते. त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. दरम्यान प्रदूषण या विषयावर काम करणाऱ्या वातावरण फाउंडेशनने एक महिना एमआयडीसी तळोजा, सेक्टर 13 पनवेल, सेक्टर 36 खारघर, नावडे, तळोजा आणि सेक्टर 7 खारघर आदी पाच ठिकाणी पार्टिक्युलेट मॅटरची घनता मोजणारे रिअल टाईम एअर क्वालिटी मॉनिटर्स बसवून 13 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या एक महिना तपासणी केली असता.

खारघर-तळोजा-पनवेल परिसरात मॉर्निंग वॉकसाठी जात असाल तर तुमचे मॉर्निंग वॉक फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसान करणारे ठरू शकतात, असं निरीक्षण वातावरण या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या वातावरण फाउंडेशन या संस्थेने महिनाभर हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतल्यानंतर हे निदर्शनास आले आहे

सकाळी सहा ते आठ या वेळेत पीएम 2.5 (पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट) कणांची पातळी खूप जास्त नोंदली गेली आहे. जवळपास सर्व दिवसांत हवेच्या प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली गेली असल्याचे अभ्यासात समोर आले. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट्स, विशेषतः पीएम 2.5 खूप सूक्ष्म असतात आणि सहज फुप्फुसांत प्रवेश मिळवून श्वसनाशी संबंधित आजारांना कारण ठरतात. ‘वातावरण’ संस्थेने तयार केलेला विस्तृत अहवाल पनवेल महानगर पालिकेच्या आयुक्तांना, लोक प्रतिनिधींना आमदार प्रशांत ठाकूर तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करणार आहे.

खारघर-पनवेल-तळोजा भागातील रहिवाशी श्वास घेत असलेल्या हवेची गुणवत्ता तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा बसविणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. नागरिकांच्या दखल घेवून हवेची गुणवत्ता नियमित तपासणं ही वायुप्रदूषण नियंत्रित करण्यासाठीचं धोरण आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणं महत्वाचं आहे. तसेच हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी औद्योगिक उत्सर्जन रोखणे, रस्त्यावरील धुळीमुळं होणाऱ्या प्रदूषणाचं व्यवस्थापन आणि पनवेलला शून्य कचरा जाळणारं शहर बनवणं महत्त्वाचं आहे. हवेच्या गुणवत्तेमुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या पाहता पनवेल महनगरपालिकेने या विषयाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत