नांदेड : गणपूर गावात दरोडेखोरांचा हैदोस

नांदेड : रायगड माझा वृत्त 

अर्धापूर तालुक्यातील गणपूर गावात रात्री दरोडेखोरांनी एक घर लुटले आहे. या दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून 1 लाख 71 हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे. यात संभाजी मोहिते यांच्या हाताची नस तुटून गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अर्धापूर-वसमत रोडपासून जवळच असलेल्या गणपूर गावात संभाजी मोहिते यांच्या घरात त्यांचे कुटुंबिय झोपलेले होते. आज (ता. 16) पहाटेच्या सुमारास दरोडेखोरानी गावापासून थोडे दूर असलेल्या त्या एका घरात प्रवेश केला. तिथे एक वृद्ध दाम्पत्य व लहान बालके होती. दरोडेखोराकडे रॉड, कोयता व चाकू सारखी शस्त्रे होती. या सर्वाना मारहाण करून घरातील कपाट फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण 1 लाख 71 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. यात संभाजी मोहिते यांच्यावर धारधार शस्त्राने मारहाण केली. यात त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.

घरात वयस्क आणि अत्यंत लहान बालकेच होती. अजूनही ते भीतीच्या वातावरणात आहेत. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलीसांसह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक घटना स्थळी पोहोचले. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती,  महादेव मांजरमकर सह अनेक पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वान पथकाला पाचारण आले होते. दरोडेखोराना लवकरच जेरबंद करू अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक महादेव मांजरमकर यांनी दिली. याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या दरोड्यांमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत