नागपूर पुन्हा हादरले, भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील 5 जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

नागपूर : रायगड माझा 

मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद ज्यांच्याकडे आहे अशा देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात पुन्हा एकदा दहशत निर्माण करणारी घटना घडली आहे. येथील दिघोरी भागामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या झालेले कुटुंब भाजप कार्यकर्त्याचे असल्याचे सांगितले जात आहे. नागपुरात वारंवार अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.

रविवारी रात्री झालेल्या या हत्याकांडामध्ये दिघोरी परिसरातील भाजप कार्यकर्ते कमलाकर पोहनकर यांच्या कुटुंबाचा खात्मा करण्यात आला आहे. धारदार शस्त्राचा वापर करून कमलावर पवनकर यांच्या कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली. मृतांमध्ये कमलाकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील लहान मुलगा आणि मुलीचा समावेश असल्याचीही माहिती समोर येतेय. तसेच एका वृद्ध महिलेलाही निर्घृणपणे ठार करण्यात आले आहे. या हत्याकांडामागचे नेमके कारण काय याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. रात्रीच्या वेळी हत्याकांड झालेले असल्याने दरोड्याच्या हेतूने हा प्रकार झालेला आहे का संशय व्यक्त केला जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत