नागराज मंजुळेचा ‘झुंड’ वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी हैदराबादमधील दिग्दर्शक नंदी चिन्नी कुमार यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या आगामी झुंड चित्रपट चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस बजावली आहे. नंदी चिन्नी कुमार यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते अमिताभ बच्चन, निर्माते कृष्णन कुमार आणि टी सिरीजचे भूषण कुमार यांना नोटीस बजावली आहे.

झुंड चित्रपटाच्या टीमनं कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  नागराज मंजुळेच्या झुंडची कथा अखिलेशचे प्रशिक्षक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. परंतु, विजय बरसे यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवताना अखिलेशलची कथा चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाची ठरते. त्यामुळे सहाजिकच झुंडमध्ये अखिलेशची कथाही दाखवली जाणार. याच कारणानं झुंडच्या टीमकडून कॉपीराइटच उल्लंघन झाल्याचं कुमार यांचं म्हणणं आहे. चित्रपटाच्या टीमला नोटीस पाठवल्यानंतर केवळ टी-सिरीजकडून नोटीसला उत्तर मिळाले असंही नंदी चिन्नी कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत