नवी दिल्ली : महाराष्ट्र News 24 वृत्त
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन मोदी सरकार अडचणीत आलं आहे. या सरकारविरोधात देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरु असताना आता भारताबाहेरही या कायद्याचे पडसाद उमटत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यानं नागरिकत्व कायद्यावरुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे.
पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर आसिफ गफूर यांनी केलेल्या एका ट्विटवर शाहिद आफ्रिदीनं प्रतिक्रिया दिलीय. ‘मोदींची वेळ आता भरत आलीय. हिंदुत्वाच्या विचारसणीचा आता देशभरातून विरोध होताना दिसतोय. जम्मू-काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण भारतात आता मोदींना विरोध होतोय. भारत सरकारने नागरिकत्व कायदा लवकरात लवकर मागे घ्यावा, नाहीतर त्यांना भविष्यात याचं फळ मिळेल’, असं ट्विट शाहिद आफ्रिदीनं केलं आहे.
Rightly said boss! Modi is losing time. His Hindutva based ideology is being resisted not only in IOJ&K but all across India too. He must undo his actions in IOJ&K and CAB against minorities. Otherwise he is fast reaching his destiny. https://t.co/6f9i7P6Okp
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) December 24, 2019