नागाव बीच येथे बुडाल्या पैकी दोघांचे मृतदेह सापडले

बोर्ली मांडला – अमूलकुमार जैन

 

अलिबाग तालुक्यातील नागाव बीच येथे फिरण्यासाठी कोपर खैरने येथून आलेल्या पर्यटकांपैकी तीन जण पाण्यात बुडाले होते.त्यापैकी दोघांचे मृतदेह रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडले आहेत.प्रज्योत नारायण पिंजारी(वय21वर्षे,राजयोगिनी सोसायटी,फ्लॅट नंबर89,सेक्टर 17,कोपर खैरने,नवी मुंबई)हा आणि त्याचे बारा मित्र असे तेरा जण फिरण्यासाठी अलिबाग येथे आले होते.ते दुपारी अलिबाग येथील वरसोली बीच वर फिरून नागाव येथे सायंकाळी साडेसहा च्या सुमारास आले.त्यांनी नागाव येथील मिहीर कॉटेज मध्ये दोन रूम बुक केल्या. त्यानंतर नागाव समुद्रात पोहण्यासाठी गेले असता समुद्राला भरती येत असल्याने समुद्राचे पाणी वाढू लागल्याने फिर्यादी आणि त्यांचे इतर मित्र बाहेर आले मात्र सुहाद सिद्दीकी(वय 21 वर्षे),आशिष रामणारायन मिश्रा(वय20वर्षे)आणि चैतन्य किरण सुळे(वय20वर्षे) असे तीन जण समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले असल्याची खबर अलिबाग पोलीस ठाण्यात प्रज्योत पिंजारी यांनी दिली होती. आज सकाळी दहाच्या सुमारास बोर्ली कोर्लई गावादरम्यान असलेल्या मोरुबाईची काठी लगत असलेल्या समुद्र किनारी सुहाद सिद्दीकी याचा तर आग्रव येथे आशिष रामणारायन मिश्रा याचा मृतदेह सापडला आहे.तर चैतन्य सुळे याचा शोध रेवदंडा पोलीस घेत आहेत

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत