नाटक-बिटक : विद्यार्थ्यांच्या वाचिक अभिनयाचा कस लागणार

‘आयपार’ संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय नाटय़ महोत्सवांतर्गत नाटय़वाचन स्पध्रेचं आयोजन

अभिनयामध्ये कायिक, वाचिक, आंगिक आणि आहार्य हे चार प्रकार सांगितले आहेत. मराठी रंगभूमी शब्दप्रधान असूनही वाचिक अभिनयाकडे तितकंसं लक्ष दिलं जात नाही. केवळ शब्दांच्या माध्यमातून नाट्य उभं करण्याचं आव्हान नाटय़वाचन स्पर्धातून मिळतं. त्यातून वाचिक अभिनयाचा कस लागतो. विद्यार्थ्यांच्या वाचिक अभिनयाचा कस पाहणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन नाटय़वाचन स्पध्रेचं आयोजन ‘आयपार’ या संस्थेतर्फे करण्यात आलं आहे. १ ते १२ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.

आयपार (इंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉìमग आर्ट्स अँड रिसर्च) या संस्थेतर्फे पुण्यात नोव्हेंबरमध्येच आंतरराष्ट्रीय नाटय़ महोत्सव आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाचाच एक भाग म्हणून ही नाटय़वाचन स्पर्धा होणार आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं यंदा दुसरं र्वष आहे. तर नाटय़ वाचन स्पर्धा प्रथमच आयोजित केली जात आहे. महाविद्यालयीन स्तरावर पुण्यात सुमन करंडक नाटय़वाचन स्पर्धा होते. त्याशिवाय पुरुषोत्तम करंडक स्पध्रेतही सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनयासाठी ‘यशवंत स्वराभिनय’ हे पारितोषिक दिलं जातं. विद्यार्थ्यांना वाचिक अभिनयाची समज यावी हाच त्यामागील हेतू. खरंतर वाचिक अभिनय हा महत्त्वाचा नाटय़गुण आहे. केवळ वाचिक अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना बसल्याजागी खिळवून ठेवणं ही अभिनेत्यासाठी कसोटी असते. मराठी रंगभूमीला नानासाहेब फाटक, डॉ. श्रीराम लागू, विक्रम गोखले अशा उत्तम वाचिक अभिनय असलेल्या अभिनेत्यांची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वाचिक अभिनयाकडे तितकंसं लक्ष दिलं जात नाही. इंग्रजी, िहदीचा होत असलेला भडिमार, कमी झालेलं वाचन अशा कारणांनी वाचिक अभिनय ऑप्शनलाच राहिला. या नाटय़वाचन स्पध्रेच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या नाटय़ वाचनाचा, वाचिक अभिनयाचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे.

आयपारचे संचालक व नाटय़ दिग्दर्शक प्रसाद वनारसे यांनी स्पध्रेविषयी माहिती दिली. ‘पूर्वी पुण्यात नाटय़वाचनाच्या बऱ्याच स्पर्धा व्हायच्या. त्यात पूर्ण नाटकंही वाचली जायची. त्यातून वाचिक अभिनयाचा खऱ्या अर्थानं कस लागायचा. मात्र, आता तशा स्पर्धाच राहिल्या नाहीत. परिणामी, वाचिक अभिनय हा महत्त्वाचा घटक असूनही त्याकडे तितक्या गांभीर्याने पाहिलंच जात नाही. नाटय़वाचन हा आव्हानात्मक प्रकार आहे. त्यात वाचिक अभिनय, भाषा यांचा कस लागतो. विद्यार्थ्यांना वाचिक अभिनयाचं महत्त्व कळावं, या हेतूने ही नाटय़वाचन स्पर्धा होणार आहे. स्पध्रेसाठी नाटक निवडण्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचं वाचनही होईल. आंतरराष्ट्रीय नाटय़ महोत्सवा दरम्यानच ही स्पर्धा होणार असल्यानं विद्यार्थ्यांना देशोदेशीची नाटकंही पाहता येतील. स्पध्रेशिवाय वाचिक अभिनय, नाट्यवाचनाबाबत सविस्तर मार्गदर्शनासाठी एक कार्यशाळाही आयोजित करण्याची कल्पना आहे,’ असं वनारसे यांनी सांगितलं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत