नाणार प्रकल्पावरून सभागृहात रणकंदन! विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

नागपूर :रायगड माझा 

विधानसभेत शुक्रवारी कोकणातील नाणार प्रकल्पावरून पुन्हा एकदा रणकंदन माजले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणर प्रकल्प प्रश्नी निवेदन दिले. नाणर प्रकल्प लादणार नाही, चर्चा करून हा प्रश्न सोडवू असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, शिवसेनेसह विरोकांचा नाणारला विरोध कायम असल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरुवातीला विधानसभा 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. परंतु विरोधकांनी वेलसमोर निदर्शने करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे शिवसेनेच्या आमदारांनी विरोधकांना साथ दिली. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत (ता. 16) तहकूब करण्यात आले.

विनाशकारी प्रकल्प कोकणात नको- शिवसेना

नाणार प्रकल्पामुळे कोकणच्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. त्यामुळे असा विनाशकारी प्रकल्प कोकणात नको, असे शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी सांगितले. नाणार प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, अशी मागणीही सुनील प्रभु यांनी केली आहे.

सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली- विखे पाटील

नाणर प्रकल्प म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे, असे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत