नातीच्या छेडखानीचा जाब विचारणाऱ्या आजीच्या अंगावर घातली रिक्षा;रिक्षाचालकाची गुंडगिरी

नाशिक : रायगड माझा वृत्त 

घरात घुसून नातीची छेडखानीचा जाब विचारणा-या आजीच्या अंगावर रिक्षा घालून जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास जय भवानी रोडवरील लवटे मळ्यात घडली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लवटे मळा परिसरात अठरा वर्षीय तरुणी आपल्या आजी-आजोबांसह राहते़ शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास संशयित आरकान इस्माइल पठाण, सनी इंगळे व त्यांचे इतर साथीदार (सर्व रा. सिन्नर फाटा, नाशिकरोड) हे तरुणीच्या घरी गेले. संशयित पठाण याने तरुणीस आवाज दिल्याने ती घराच्या दरवाजात आली असता पठाण व इंगळे यांनी तिची छेडखानी केली़

याचा जाब तरुणीच्या आजीने विचारून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता रिक्षातून आलेल्या संशयितांनी अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला़ तरुणीच्या आजीच्या पायावरून रिक्षाचे चाक गेल्याने ती जखमी झाली आहे़ याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात संशयित पठाण, इंगळे व त्याच्या साथीदाराविरोधात प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत