नाना पाटेकरकडून कोणतीही नोटीस आलेली नाही-तनुश्री दत्ता

मुंबई : रायगड माझा वृत्त 

अभिनेता नाना पाटेकरकडून आपल्याला कोणतीही नोटीस आलेली नाही अशी माहिती अभिनेत्री तनुश्री दत्ताने दिली आहे. कायदेशीर नोटीस देण्याच्या धमक्या याआधीही देण्यात आल्या आहेत. माझ्यासारखा चुकीचा अनुभव कोणालाही येऊ नये यासाठी या प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र मी घाबरणार नाही. मात्र मी आज माझ्यासारखा अनुभव घेतलेल्या सगळ्यांना हे आवाहन करते की कोणालाही घाबरू नका, सत्य समाजासमोर आणा समाज तुम्हाला नक्कीच पाठिंबा देईल. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना तनुश्री दत्ताने ही प्रतिक्रिया दिली आहे.

२००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकरने आपल्यासोबत गैरवर्तन केले. नाना पाटेकरने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असा आरोप तनुश्री दत्ताने केला. त्याहीवेळा तिने आरोप केला आता नव्याने तिने हा आरोप केला आहे. अशात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तिने मनसेने माझी गाडी फोडली.

नाना पाटेकर हा चिंधी अॅक्टर आहे तर राज ठाकरे हे गुंड आहेत आणि त्यांना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती ती मिळाली नाही म्हणून ते गुंडगिरी करत आहेत. असेही आरोप तिने केले आहेत. नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताचे सगळे आरोप फेटाळले आहेत. तर तिला कायदेशीर नोटीस पाठवल्याचंही नाना पाटेकरांच्या वकिलांनी सांगितलं आहे. मात्र आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे तनुश्री दत्ताने म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत