नाना पाटेकरांची पत्रकार परिषद अर्ध्या मिनिटात आटोपली

मुंबई: रायगड माझा वृत्त 

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी अभिनेता नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. मी दहा वर्षांपूर्वी जे बोललो होतो, तेच सत्य आहे, असे यावेळी नाना पाटेकर यांनी सांगितले. मात्र, वकिलांनी सांगितल्यामुळे मी यावर अधिक बोलणार नाही, अशी भूमिका घेत नाना पाटेकर यांनी ही पत्रकार परिषद अवघ्या अर्ध्या मिनिटात आटोपती घेतली.

मला प्रसारमाध्यमांशी बोलायला आवडते. मी नेहमीच तुमच्याशी संवाद साधतो. मात्र, सध्या माझ्या वकिलांनी मला प्रसारमाध्यमांशी बोलायला मनाई केली आहे. अन्यथा मी कधीच यावर प्रतिक्रिया दिली असती, असे नाना पाटेकर यांनी सांगितले. मी दहा वर्षांपूर्वी बोललो होतो तेच सत्य आहे, असे सांगत नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.


 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत