नापास होण्याच्या भितीने 3 विद्यार्थीनींचे विषप्राशन; दोघींचा मृत्यू

खामगाव : रायगड माझा वृत्त

स्थानिक नॅशनल हायस्कुल मधील 10 व्या वर्गातील 03 विद्यार्थीनींनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यातील दोघींचा 24 फेब्रुवारी रोजी सकाळी अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युनंतर शहरात अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र यातील तिसऱ्या विद्यार्थीनीला रविवारी दुपारी उलट्या, मळमळ होत असल्याने स्थानिक सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी सदर विद्यार्थीनीने घटनेबाबत माहिती दिली. प्रॅक्टीकल खराब गेल्यामुळे नापास होण्याच्या भितीने या तिघींनी विष प्राशन केल्याचे तिने सांगितले.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक ए.के.नॅशनल हायस्कुल मध्ये वर्ग दहावीत शिकत असलेल्या कु. निकिता रोहणकार (17) रा.किसन नगर व नयना शिंदे (15) रा.चिंतामणी नगर या दोघींची प्रकृती खालावल्याने 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 07 वा. त्यांना स्थानिक सरकारी रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. यावेळी त्यांनी पाणी पुरी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे नातेवाईक व डॉक्टररांना सांगितले. दोघींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोेपचार रुग्णालयात रेफर करण्यात आले.

दरम्यान दि.24 रोजी उपचारादरम्यान सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या दोघींची मैत्रीन रुपाली किशोर उनोने (15) रा. झांसी नगर हिची प्रकृती खालावल्याने तिला नातेवाईकांनी स्थानिक सामान्य रुग्णालयात भर्ती केले. रुपालीला सुध्दा गेल्या दोन दिवसांपासून त्रास होत होता. मात्र नातेवाईकांनी तिला खाजगी रुग्णालयात भर्ती करुन उपचार केले. रविवारी मात्र प्रकृती खालावल्याने तीला सामान्य रुग्णालयात भर्ती करण्यात आले. यावेळी तीने पोलिस व पत्रकारांना घटनेची सविस्तर माहिती दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत