नारायण राणे यांनी जाहीर केली सर्वात मोठी भूमिका

कणकवली: महाराष्ट्र News 24 वृत्त 

राजकारणातील आक्रमक नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा केलाय. शिवसेनेसोबतचं सगळं जुनं वैर विसरून मी जुळवून घ्यायला तयार आहे. मात्र हे एकतर्फी असू नये तर त्यासाठी शिवसेनेनही पुढाकार घ्यावा असं मतही नारायण राणे यांनी यावेळी व्यक्त केलं. राज्याच्या विकासासाठी शिवसेनेसोबत मी आहे असंही त्यांनी सांगितलं आहे.

पुढे जायचं असेल तर जुनं वैर विसरून जायला पाहिजे. किती दिवस त्याच गोष्टींवर आपण अडून बसणार आहोत असा सल्ला आपण नारायण राणे यांना दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होत.रविवारी दिलेल्या एका मुलाखतीत नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. तोच धागा पुढे नेत नारायण राणे यांनी आज ही भूमिका मांडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढच्या काळात मोठ्या घडामोडी घडतील असे संकेत मिळत आहेत.राणे पुढे म्हणाले, मी शिवसेनेसोबत कटुता संपवायला तयार आहे. पण शिवसेनेने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. एकतर्फी निर्णय होणार नाही. मी दिल्लीत राहावं की महाराष्ट्रात हे मुख्यमंत्री फडणवीसच ठरवतील. राजकारणात आपल्या मनावर काही नसतं. भाजपा मला जिथे ठेवेल तिथे राहीन असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

 

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत