नाव ठरलं .. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद

प्रवीण तोगडिया यांची नवी हिंदुत्ववादी संघटना 

मुंबई :रायगड माझा

प्रवीण तोगडियांनी नव्या संघटनेची स्थापना केली असून ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ असं या संघटनेचे नाव आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडियांनी आता या संघटनेची स्थापना केली असून धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी ही संघटना चालवली जाणार आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पराभूत झाल्यापासूनच तोगडिया नाराज होते. भाजपच्या नेत्यांवर टीका करून त्यांनी आपली नाराजीही वेळोवेळी व्यक्त केली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.