नाशिकमधील देवळ्याजवळ बस अपघात, पाच ठार

नाशिक :रायगड माझा वृत्त 

देवळा तालुक्यातील देवळा-चांदवड राज्य महामार्गावरील भावडबारी घाटात बस व ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील ५ जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातात बारा जण गंभीर जखमी झाले असून जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात इतका भीषण होता की, यामध्ये बसचे मोठे नुकसान झाले असून एका बाजूने बस पूर्णपणे फाटली आहे. हा अपघात झाला तेव्हा चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहूल आहेर त्या मार्गाने देवळ्याकडे जात होते, त्यांनी लगेच मदत कार्य सुरू केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत