नाशिकमध्ये भाजपाला धक्का! वसंत गीते व सुनील बागूल यांची घरवापसी, शिवबंधन बांधलं

नाशिक : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त 

LIVE | हरिद्वारमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, रेल्वे लाईनच्या ट्रायलदरम्यान  ट्रेनखाली येऊन चार जणांना मृत्यू Live Updates In Marathi

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का लागला आहे. नाशिकमधील भाजपाचे वरिष्ठ नेते वसंत गीते आणि सुनील बागूल यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा आटोपल्यानंतर हे दोन्ही नेते मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, असं यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी सांगितले.

राऊत म्हणाले, “नाशिक हा पुन्हा एकदा शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला बनावा याची जबाबदारी या दोन्ही नेत्यांची असणार आहे. मी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्यावतीनं या दोघांचं शिवसेनेच्या परिवारात मनापासून स्वागत करतो. नाशिकमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचं मनापासून स्वागत केलं आहे.” दरम्यान, शोभा मगर, प्रकाश दायमा हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर इतर अनेकांनीही शिवसेनेशी संपर्क साधला असून, महापालिकेतील अनेक महत्वाच्या नेत्यांचाही यात समावेश असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

शिवसेनेचा हा कुठलाही मास्टर प्लान नाही तर आता प्रवाह बदलोय, हवा बदलतेय अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच कोणत्याही परिस्थितीत नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच असेल असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत