नाशिक-औरंगाबाद महामार्गावर ट्रक नदीपात्रात कोसळला, चालकाचा दुर्दैवी मृत्यू

निफाड : रायगड माझा वृत्त 

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर लोखंडी भंगारने भरलेला ट्रक नदीपात्रात कोसळला. कादवा नदीपात्राच्या पुलावरुन हा ट्रक खाली कोसळला. शुक्रवारी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर निफाडजवळ मध्यरात्री हा अपघात झाला. यात चालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

हा ट्रक लोखंडी कठडे तोडून सुमारे ४० फूट खोल नदीपात्रात कोसळला. ट्रकचालकासह ट्रकमध्ये नेमके किती जण होते याचा अजून तपास लागला नाही. अपघात मध्यरात्री झाल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. नदीपात्रात पाणी असल्याने ट्रकचालक व क्लिनर अथवा इतर किती व्यक्ती त्यात होत्या हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्‍थळी मदतकार्य सुरू असून निफाड पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कठडे तुटलेल्या ठिकाणावर बॅरिकेट बसवून वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत