नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेची धडक

नाशिक : रायगड माझा वृत्त

इंधन दरवाढीचा निषेध करीत आज शिवसेनेने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर त्वरित समाधानकारक कमी करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शिवसेना ठिकठिकाणी रस्त्यावर उतरेल. यानंतर उद्भवणाऱया कायदा-सुव्यवस्थेला प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदन जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले. प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयावरही मोर्चे नेऊन निदर्शने करण्यात आली, दरवाढ कमी करण्याचे निवेदन देण्यात आले.

शालिमार येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयापासून सकाळी साडेअकरा वाजता हजारो शिवसैनिकांचा मोर्चा इंधन दरवाढीचा निषेध करीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. दरवाढीमुळे मोटारसायकलने क्रेनला लटकून फास घेतल्याचा प्रतिकात्मक चित्ररथ लक्षवेधी ठरला.

125 कोटी जनतेचे कंबरडे मोडले

पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे, अशी मागणी केली. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलची किंमत 30 डॉलर प्रतिबॅरल असतानाही शासनाने वेगवेगळे कर लादून इंधन दरवाढ सुरूच ठेवली. आता 90 डॉलरचा भाव असतानाही इंधन दर गगनाला भिडले आहेत. या दरवाढीमुळे देशातील 125 कोटी जनतेचे कंबरडे मोडले आहे, त्यांचे जीणे मुश्कील झाले आहे. शासनाने इंधनाचे दर समाधानकारक कमी करावे, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱयांना सांगितले, तसे निवेदनही दिले.

झालीच पाहिजे; दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले; दरवाढ करणाऱया सरकारचा निषेध असो; आता जनता सहन करणार नाही महागाई, जनतेला आहे शिवसेनेची साथ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शिवसैनिकांनी पांढऱया, भगव्या टोप्या घातल्या होत्या. त्यांच्या हातातील भगव्या झेंडय़ांनी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. या मोर्चात बैलगाडीही सहभागी करण्यात आली होती. जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, दिलीप दातीर हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बैलगाडीनेच पोहचले. त्यांच्यासह उपनेते बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, दत्ता गायकवाड, सत्यभामा गाडेकर यांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांच्याशी चर्चा केली.

या आंदोलनात नगरसेवक आर. डी. धोंगडे, श्याम साबळे, भागवत आरोटे, प्रशांत दिवे, सुधाकर बडगुजर, केशव पोरजे, चंद्रकांत लवटे, यतिन वाघ, पश्चिम विधानसभा संपर्कप्रमुख नीलेश चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क संघटक रंजना नेवाळकर, श्यामला दीक्षित, मंदाबाई दातीर, हर्षा बडगुजर, सुनिता कोठुळे, जयश्री खर्जुल, शुभांगी नांदगावकर, अलका गायकवाड, प्रेमलता जुन्नरे, शोभा गटकळ, योगेश बेलदार, राहुल दराडे, सुनील जाधव, संतोष ठाकूर, मामा ठाकरे, नाना पाटील, सुभाष गायधनी, सचिन बांडे, उमेश चव्हाण, पप्पू टिळे, दादाजी आहिरे, प्रताप मटाले, बाळू कोकणे, रमेश उघडे, शिवाजी भोर यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत