निजामपूर मंडळ अधिकारी व शिरवली तलाठी लाचखोर 

चार हजार रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत विरोधी पथकाने रंगेहात पकडले

माणगाव :- प्रवीण गोरेगावकर 

माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे कार्यालयात मंडळ अधिकारी व शिरवली तलाठी सजा याना प्रत्येकी दोन हजार रुपया प्रमाणे चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक खाते रायगड अलिबाग यांच्या पथकाने पकडले. या घटनेने माणगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली.
27 वर्षाच्या एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आपण  नवीन खरेदी केलेल्या शेत जमिनीची 7/12 नोंद करण्यासाठी गेले असता निजामपूर  मंडळ अधिकारी अजय जाधव व शिरवली तलाठी सजा वैभव आंब्रे या दोघांनी तक्रार दाराकडे चार हजार रुपये लाचेची मागणी केली. त्या नंतर तक्रार दराने या बाबत 22 जून रोजी लाच लुचपत प्रतिबंधक खाते रायगड अलिबाग यांच्या कार्यालयाकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीची पडताळणी 26 जून मंगळवार रोजी सायंकाळी 4. 30 वाजण्याच्या सुमारास पथकाने सापळा रचून या दोन लाचखोरांना निजामपूर यथील कार्यालयात पैसे स्वीकारताना रंगे हात पकडले.
या दोघा आरोपींना पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात भ्र.प्र. अधिनियम कलम 7, 13 (1)(ड),13(2)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक खाता रायगड अलिबाग विवेक जोशी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पोलीस हवालदार बळीराम पाटील, पोलीस हवालदार विश्वास गंभीर, महिला पोलीस हवालदार जागृती पाटील, पोलीस शिपाई निशांत माळी, यांच्या पथकाने हि कारवाई केली.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत