नितीशकुमार यांच्या उलटसुलट खेळी; भाजप चक्रावला

 

पाटणा : रायगड माझा 

लोकसभा निवडणुकीला अवघे दहा महिने उरले असताना संयुक्त जनता दलाचे नेते, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ‘उलटसुलट’ खेळी करीत भाजप नेत्यांना चांगलेच चक्रावून टाकले आहे. आजारी असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांची दूरध्वनीवरून विचारपूस केल्याच्या पाठोपाठ नितीशकुमार यांनी आज लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांच्याशीही संवाद साधला. त्यामुळे भाजप-एनडीएच्या गोटात ‘टेन्शन’ वाढल्याचे दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ‘एनडीए’चा चेहरा अशी भाजपची भूमिका आहे, मात्र बिहारमध्ये संयुक्त जनता दलाने वेगळी भूमिका घेतली आहे. त्या पक्षाच्या नेत्यांनी बिहारमध्ये ‘जदयु’च मोठ्या भावाची भूमिका बजावेल आणि नितीशकुमार हेच ‘एनडीए’चा ‘चेहरा’ असतील अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे भाजप-जदयु यांच्यात बिहारमध्ये बेबनाव तयार झाला असून जागावाटपावरूनही तणातणी होईल, असे स्पष्ट झाले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत