नितीशजी भाजप सोबतच! बिहारमध्ये असलेली आघाडी अशीच कायम राहाणार-अमित शहा

रायगड माझा वृत्त 

पाटणा : भाजपाध्यक्ष अमित शहा एनडीएचा सहकारी पक्ष असलेल्या जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आज भेट झाली. या भेटीनंतर अमित शहा यांनी नितीश कुमार भाजपबरोबरच राहणार असल्याचे जाहीर केले. नितीश कुमार आमच्याबरोबर होते आणि कायम राहतील असे शहा म्हणाले. भापला सहकारी पक्षांना सांभाळणे चांगले जमते असेही शहा यावेळी म्हणाले.

आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. या भेटीत जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. अमित शहा गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास पाटण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांनी सुशील कुमार यांची भेट घेतली.

उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी एअरपोर्टवर अमित शहांचे  स्वागत केले. यावेळी बिहार भाजपाध्यक्ष नित्यानंद राय, बिहार प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी पवन शर्मा, सीआर पाटील यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती होती.

अमित शहा तीन वर्षांनी बिहारमध्ये
जेडीयूने एनडीएमध्ये पुनरागमन केल्यानंतर अमित शहा प्रथमच बिहारमधअये आलेले आहेत. या दौऱ्यात अमित शहांच्या विविध बैठका होणार आहे. मात्र सर्वांचेच लक्ष लागलेले आहे ते, शहा आणि नितीश यांच्या बैठकीवर.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत