नियंत्रण सुटल्याने विमान धावपट्टीवर उतरताना समुद्रात घुसले; सर्व ४७ प्रवाशी सुखरुप

रायगड माझा वृत्त 

एक प्रवाशी विमान धावपट्टीवर उतरताना नियंत्रण सुटल्याने थेट पॅसिफिक महासागरात घुसल्याची घटना येथील एका बेटावर घडली. सुदैवाने यातील सर्व ४७ प्रवाशी सुखरुप वाचवण्यात आले आहेत. दक्षिण पॅसिफिक महासागरातील मायक्रोनेशिया या देशाच्या वेनो बेटावरील चुक आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही दुर्घटना घडली. हे विमान धावपट्टीच्या सुमारे १५० यार्ड पुढे जात जवळच्या समुद्रात घुसले.

विमान समुद्रात घुसल्यानंतर एकाही प्रवाशाला गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, पाण्यावर तरंगणाऱ्या या विमानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दक्षिण पॅसिफिक महासागरातील मायक्रोनेशियाच्या वेनो बेटावरील चुक आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर न्युगिनीच्या विमानाला हा अपघात घडला. एअर न्युगिनी लिमिटेड ही विमान कंपनी पापुओ न्युगिनी या देशाची राष्ट्रीय विमान कंपनी आहे.

दरम्यान, चुक विमानतळाचे व्यवस्थापक जिम्मी एमिलिओ यांनी या अपघाताबाबत राउटर्स या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी फोनवरुन बोलताना सांगितले की, शुक्रवारी स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरत असताना त्याचे नियंत्रण सुटल्याने ते थांबण्याऐवजी धावपट्टीच्या पुढे १५० यार्ड धावत राहिले आणि पॅसिफिक महासागरातील लोगून समुद्रात घुसले आणि बुडाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत