निरंजनच्या विरोधात शरद पवार मैदानात!

मुंबई: रायगड माझा वृत्त

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जोमाने तयारीला लागली आहे. निरंजन डावखरे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रिंगणात उतरले आहेत.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासमोर भाजपच्या निरंजन डावखरे यांचं आव्हान आहे. या निवडणुकीच्या रणनीतीसाठी  बुधवारी म्हणजेच उद्या पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. स्वतः शरद पवार बैठकीला संबोधित करणार आहेत. नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणेश नाईक,जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

गद्दारांना धडा शिकवू
दरम्यान, पक्ष सोडून गेलेल्या निरंजन डावखरे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. गद्दारांना धडा शिकवू असा पवित्रा जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत