निरंजन दाखवणार खरे ‘डाव’

निरंजन डावखरे भाजपच्या वाटेवर?

रायगड माझा विशेष वृत्त |

राष्ट्रवादीचे कोकण पदवीधर मतदार संघातील आमदार निरंजन डावखरे  हे राष्ट्रवादी मध्ये अस्वस्थ असल्याच्या बातम्या काही दिवस झळकत आहेत. निरंजन डावखरेंची भाजपाशी जवळीक वाढलीआहे. ते आमदार असलेल्या कोकण मतदार संघाची निवडणूक येत्या  ८ जून रोजी होत असून  या निवडणुकीत ते राष्ट्रवादीला खरे ‘डाव ‘दाखवतील अशी चर्चा राजकीय  वर्तुळात सुरु आहे.

कोकण पदवीधर मतदार संघात  भाजपचा पराभव करून  राष्ट्रवादीच्या  तिकिटावर निरंजन आमदार झाले. डावखरे कुटुंबाचे  नेहमीच सर्वच राजकीय पक्षाशी घनिष्ठ संबंध राहिले आहेत. वसंत डावखरे यांची आणि शिवसेनेची मैत्री देखील राजकारणात  नेहमी चर्चेचा विषय ठरायची . पण वसंत डावखरे हे कायम शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले आणि त्याचे राजकीय लाभ त्यांना वेळोवेळी मिळाले. पण निरंजन डावखरे मात्र वेगळी वाट धरणार अशी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री अन्य पक्षातील ज्या काही आमदारांशी सातत्याने संपर्क ठेऊन आहेत त्यामध्ये निरंजन डावखरे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या गुड बुक मध्ये समावेश एवढीच त्यांची जमेची बाजू राहिली आहे. कोकण पदवीधर मतदार संघातील आमदार म्हणून त्यांचा अजिबात प्रभाव राहिलेला नाही. कोकणातील पदवीधरांची सोडा काही स्थानिक विकासाचे प्रश्न त्यांनी मांडले अशीही परिस्थिती नाही. त्यांच्या स्थानिक विकास निधीतून काय कामे झाली? हा  देखील संशोधनाचा विषय राहिलेला आहे. या पार्श्वभूमीवर निरंजन डावखरेंचे खरे डाव  राष्ट्रवादीला घायाळ करतात कि त्यात ते स्वतःचे अस्तित्व गमावून बसतात हे आगामी काळातच  स्पष्ट होईल .

 

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत