निवडणुका एकत्र घेण्याची चर्चा हे बळकट लोकशाहीचे संकेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

 देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत होत असलेली चर्चा हे बळकट लोकशाहीचे संकेत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आकाशवाणीवर ‘मन की बात’मध्ये रविवारी सांगितले. निवडणुका एकत्र असाव्यात की नाहीत यावर लोक स्पष्टपणे आपली मते मांडत आहेत, हे चांगले लक्षण आहे, असेही ते म्हणाले. दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी निवडणूक प्रक्रियेत अनेक चांगल्या सुधारणा केल्याचे मोदी म्हणाले.


मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी देश पाठीशी

महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना मोदी यांनी तीन तलाकचा मुद्दा उपस्थित केला. हे विधेयक लोकसभेत पारित झाले आहे. राज्यसभेत अजून मंजूर झालेले नाही. मात्र, मुस्लिम महिलांना मी विश्वासाने सांगू इच्छितो की सबंध देश त्यांना न्याय देण्यासाठी पाठीशी उभा आहे, असे मोदी म्हणाले.

महिला शक्तिविरुद्ध अन्याय सहन करणार नाही

बलात्कारातील दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी संसदेने कायदा केला असल्याचे सांगून महिलांवरील हा अत्याचार सहकन केला जाणार नाही, असे मोदी म्हणाले. मध्य प्रदेशातील मंदसौर बलात्कार प्रकरणात स्थानिक न्यायालयाने कमीत कमी वेळेत दोषींना शिक्षा सुनावल्याचे त्यांनी नमूद केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत