निवडणूक प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिलेल्या शिक्षकावर होणार कारवाई

म्हसळा : निकेश कोकचा 

म्हसळा तालुक्यात येऊलागलेल्या बारा ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रशिक्षणासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकापैकी बावीस शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गैरहजर राहिले होते.या गैरहजर  शिक्षकांविरुद्ध म्हसळा तहसिलदारांनी करणे दाखवा नोटीस काढील असून दोन दिवसात या बाबत योग्य उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
म्हसळा केंद्रातील श्रीम.प्रणिता रामदास गावित,कल्पना दीपक पाटील,वंदना खोत वरवटणे केंद्रातील दीपक सोनावले,इब्राहीम जमादार,नूरजहा दळवी,संगीता आंबेडकर,तृप्ती सावंत,अबिना बागवान संदेरी केंद्रातील मनोहर राठोड,कणघर केंद्रातील धर्मराज चिकणे,पाभरे केंद्रातील हिरामण माने,दिनेश रांगले,तंव्ही चव्हाण,मनीषा शिर्के,पाष्टी केंद्राती गजानन पानवलकर,चिखलप केंद्रातील मेघा गुढे,अश्विनी क्षीरसागर,खामगाव केंद्रातील दीप्ती साठे,नेवरूळ केंद्रातील पुष्पा खेड्गे,आमशेत केंद्रातील नाझनिस खान व मेंदडी केंद्रातील मुन्नवर्स कोंडविलकर या शिक्षिका व शिक्षकांचा समावेश यामध्ये आहे.
मा.राज्य निवडणूक आयोग यांचेकडील निर्देशानानुसार जून २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती व पोटनिवडणुकीचा निवडणूक कायक्रम जाहीर झालेला आहे.त्यानुसार दिनांक २७ मे रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.परंतु निवडणूक कामी नियुक्त केलेले कर्मचारी दिनांक १८ मेच्या प्रशिक्षणासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमास वरील बावीस जण गैरहजर राहिले होते.या बावीस जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात यांनी सदर नोटीसला उत्तर न दिलास त्यांच्यावर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ कलम १३४ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही म्हसळा तहसिलदारांनी दिला आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत