निवडणूक फलक फाडणे किंवा विद्रुप करणे म्हणजे खालच्या पातळीवरचे राजकारण

शिवसेनेचे अजय ( राजा)  सोडेकर यांचा हल्लाबोल  

मुरूड : अमूलकुमार जैन

मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक2018 च्या निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतसे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.असे प्रतिपादन शिवसेनेचे बोर्ली येथील  जेष्ठ नेते अजय(राजा)सोडेकर मोती यांनी बोर्ली येथील प्रचार सभेत केले.
बोर्ली ग्रामपंचायत निवडणूकीची तारीख ही जवळ येऊ लागतात विरोधकांच्या पायाखाली असणारी वाळू सरकू लागली आहे. त्यामुळे त्यांचा पराभव त्यांना डोळ्यासमोर दिसू लागला आहे.म्हणून त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचे छायाचित्रे असलेले फलकावर दिवसाढवळ्या ब्लेडने वार करीत फलक  दोन दिवसांपूर्वी फाडले.तर  आता तर विरोधकांनी चक्क फलक हे विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला मात्र आमच्या सहकारी यांनी तो फलक पाण्याने धुऊन काढला .आणि विरोधकांनी केलेल्या कृत्याची माहितीसुद्धा  आम्ही ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांच्या निदर्शनास आणून दिली मात्र गावात वाद नको कारण निवडणूक ही दोन दिवसांची आणि वैर कायमच म्हणून आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. फलक कोणी फाडला होता त्याला आम्ही जाब सुद्धा विचारले.
ग्रामपंचायतमध्ये विकास कामे तर करता आली त्यामुळे मतदार देखील विरोधकांवर नाराज आहेत.आज त्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या सत्ताकाळात ग्रामस्थांना स्वच्छ पाणी आणि रस्ते दिले असते तर त्यांना घरोघरी जाऊन मताची भीक मागण्याची पाळी नसती.त्याच प्रमाणे त्यांना आमचे उमेदवार नौशाद दळवी यांच्या समोर त्यांच्याच बहीणीला उभी केली नसती.विरोधकांनी सरपंचपदी उभी केलेली उमेदवार ह्या मुंबईत कायमस्वरूपी राहत असतात.त्या गावात महिना दोन महिन्यातुन गावात येत असतात.असे उमेदवार सरपंच म्हणून निवडून गेले तर ग्रामस्थांच्या दाखल्यावर सही कोण करणार?म्हणजे सरपंच हा कोणाच्यातरी हातातील बाहुले होणारहे स्पष्ट दिसत आहे.शिवसेनेने दहा वर्षाच्या कारकीर्दीत रस्ते,पाणी पुरवठा योजना राबविली मात्र विरोधकांनी ग्रामस्थांसाठी कोणती विकासकामे केली आहे.त्यांनी जाहीरपणे स्पष्ट करावी असे आव्हानही यावेळी सोडेकर यांनी केले.
जनता ही सूज्ञ आहे त्यांनी विरोधकांच्या कोणत्याही प्रकारच्या आमिष किंवा भूलथापांना बळी पडू नका आपला विकास साधायचा असेल तर आपले बहुमूल्य मत शिवसेनेलाच देण्याचे आव्हान सरपंच पदाचे उमेदवार नौशाद  दळवी यांनी केले. यावेळी व्यासपीठावर  मुस्लिम समाज अध्यक्ष जहिर सौदागर बोर्ली शाखाप्रमुख भारत मोती,सरपंच पदाचे उमेदवार नौशाद दळवी,सदस्य पदी असलेले उमेदवार वैशाली लकडी आदी मान्यवर उपस्थित होते.
आम्ही आमच्या कडे असणाऱ्या सत्ताकाळात कोणती विकासकामे केली आहे ही जनताच दाखवून देईल.त्यामुळे आम्हाला जास्त काही बोलण्याची गरज नाही आहे :-वामन चुनेकर. माजी जिल्हा परिषद सदस्य, तथा शेकाप नेते.बोर्ली मुरूड
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत