नीटच्या परीक्षासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या शर्टच्या कॉलरला कात्री

रायगड माझा वृत्त  | पुणे

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट या सामाईक परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी

neet 2018: students frisked before entering examination halls

ड्रेस कोडचे नियम धाब्यावर बसवले. कॉलर असलेलं शर्ट घालून येण्यास मनाई केलेली असतानाही अनेक विद्यार्थी कॉलर असलेलं शर्ट घालून परीक्षेसाठी आले. त्यामुळे परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या शर्टच्या कॉलर कापण्यात आल्या आणि त्यानंतरच त्यांना परीक्षेला बसू देण्यात आलं.

देशभरात नीटच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. नीटसाठी या आधीच ड्रेस कोड लागू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्याची माहितीही देण्यात आली होती. कॉलर नसलेले शर्ट घालून येण्यापासून ते सोबत पेन न आणण्याच्या सूचनाही विद्यार्थांना देण्यात आल्या होत्या. तरीही अनेक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी ड्रेस कोडचं पालन न केल्याचं दिसून आलं आहे. पुण्यातील पिंपळे सौदागर येथे काही विद्यार्थी कॉलर असलेले शर्ट घालून आले असता त्यांना परीक्षा केंद्रावरच अडवण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या शर्टाचे कॉलर कात्रीने कापून नंतरच त्यांना परीक्षेला बसू देण्यात आलं.

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एमबीबीएस आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एकूण सहा हजार जागांसाठी ही परीक्षा होत असून देशभरातून एकूण १३.२६ लाख ९६१ लाख विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत २ लाखांनी भर पडली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत राज्यातील सुमारे १ लाख ८३ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून देशभरातील महाराष्ट्रातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. देशभरातील एकूण २ हजार २५५ तर राज्यातील ३४५ केंद्रावर नीट होणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसाठी नियमावली जाहीर केली असून सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ५ जून २०१८ रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

पोशाखासाठी नियमावली 

सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार परीक्षेदरम्यान असणाऱ्या पोशाखासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश पत्र, पासपोर्ट आकारातील छायाचित्र याशिवाय कोणत्याही वस्तु परीक्षा केंद्रात घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचे कागद, लेखन साहित्य, पाकीट, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पट्टा, सॅक, गॉगल्स, अंगठी, माळ यांसह सर्व प्रकारचे दागिने, घड्याळ, ब्रेसलेट, पाण्याची बाटली, खाण्याचे पदार्थ, कोणत्याही धातूच्या वस्तू परीक्षा केंद्रात आणण्यास मज्जाव करण्यात आल्याचं, या अगोदरच बोर्डाने जाहीर केले होते. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यांची कसून तपासणी करून या वस्तू जप्त केल्या जात होत्या.

 

पेनही परीक्षा केंद्रावरच

विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पेन ही परीक्षा केंद्रावरच दिला गेला. तर देशभरातील परंपरेनुसार घालण्यात येणाऱ्या पगडी, टोपी किंवा इतर कपडे घालणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान एक तास लवकर येण्याची सूचनाही या वेळी करण्यात आली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत