‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ३५ विद्यार्थ्यांना लवकरच जातवैधता प्रमाणपत्र मिळणार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असूनही जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेश मिळत नसल्याने संबधित विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिलासा दिला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून पालकांच्या जातवैधता प्रमाणपत्राच्या आधारावर तत्काळ विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्र देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ३५ विद्यार्थ्यांना लवकरच दाखले मिळणार आहेत.

नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने त्यांनी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने यांची दखल घेत याप्रकरणी हायकोर्टात दाद मागण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. तसेच पाच विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्रासाठी पुन्हा जातपडताळणी समितीकडे जाण्यास सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत