नीरव मोदीचा घोटाळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया

रायगड माझा ऑनलाईन | नवी दिल्ली

Image may contain: 1 personपंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटींचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर एका आठवड्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना सरकार माफ करणार नाही.

मोठी कारवाई करणार
सरकार आर्थिक विषयांशी संबंधीत अनियमिततेविरोधात मोठी कारवाई करत असून भविष्यातही करत राहणार आहे, असे पंतप्रधानांनी शुक्रवारी ठामपणे सांगितले. ET ग्लोबल बिजनेस समिटमध्ये ते बोलत होते. पीएनबी घोटाळ्याचा त्यांनी प्रत्यक्ष उल्लेख केलेला नसला तरी याच मुद्यावर ते बोलल्याचे स्पष्ट होते.

रिझर्व्ह बँकेलाही गर्भीत इशारा
तसंच पंतप्रधानांनी नाव न घेता रिझर्व्ह बँकेलाही गर्भीत संदेश दिला. मोदी म्हणाले, विविध आर्थिक संस्था आणि संघटनांमध्ये नियम आणि नैतिकता तपासण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली आहे, त्यांनी पूर्ण निष्ठेने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देखील निरिक्षण संस्था आणि लेखापालांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत