नुसत्या भाषणांनी पोट भरत नाही, सोनिया गांधींची नरेंद्र मोदींवर टीका

विजापूर: रायगड माझा

नरेंद्र मोदी हे उत्तम वक्ते आहेत. एखाद्या अभिनेत्याप्रमाणं ते भाषण करतात मात्र नुसतं भाषण करून पोट भरत नाही अशी टीका काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केली आहे.

सोनिया गांधी तब्बल दोन वर्षानंतर जाहीर सभेत आज उपस्थित होत्या. पंतप्रधान जातील तिथे खोटे बोलतात, सध्या फक्त भाषणबाजी सुरू आहे अशी टीकाही त्यांनी केली. केंद्र सरकारनं कर्नाटकच्या काँग्रेस सरकारसोबत भेदभाव केला आहे. सबका साथ सबका विकासची भाषा करणाऱ्यांना हे शोभत नाही अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधानांनी इतिहास, महत्वाच्या व्यक्ती आणि आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. या आधी असं कुठल्याही पंतप्रधानांनी असं केलं नव्हतं असा आरोपही त्यांनी केला.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत