नेरळच्या वाहतुक कोंडीमुळे नागरिक हैराण

भर रस्त्यात अधनिकृत पार्किंगमुळे होते वाहतूक कोंडी, नेरळ ग्रामपंचायत आणि पोलिसांचे मात्र दुर्लंक्ष

नेरळ : कांता हाबळे 

नेरळ शहरात दुचाकी आणि चार चाकी वाहने भर रस्त्त्यावर उभी केली जात असल्याने आणि त्यातच रुंदीकारणांची कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. सोमवारी नेरळ रेल्वे फाटक ते नेरळ अबिंका नाका या परिसरात सुमारे एक ते दीड तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतुक कोंडीमुळे नेरळ शहरातील नागरिक पुरते हैराण झाले आहेत. 

नेरळ शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कोंक्रेटीकरणांची कामे सुरू आहेत. त्यामुळे अशा रस्त्यांवर वाहतूक कोंडी होणार नाही याकडे नेरळ ग्रामपंचायत वाहतूक पोलिसांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना मात्र दिसत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी एकीकडे व वाहतूक पोलीस मात्र भलतीकडेच असतात अशी चर्चा नेरळ शहरात सुरु आहे. असाच प्रकार सोमवारी सकाळी नेरळ अबिंका नाका येथे अनधिकृतपणे गाड्या पार्किंग केल्यामुळे सुमारे दिड तास वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला .

एवढी मोठी वाहतूक कोंडी झाली असताना मात्र एकही वाहतूक पोलिस या ठिकाणी नव्हते. रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनी नेरळच्या प्रमुख रस्त्यांवर थांबणे गरजेचे आहे. परंतु तसे होताना मात्र दिसत नाही. नेरळ ग्राम पंचायत आणि पोलिसांनी याकडे नेरळच्या पार्किंग व्यवस्थेकडे लक्ष दिले तर  नक्कीच नेरळ शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत