नेरळच्या हुतात्मा चौकात मध्यरात्री ध्वजारोहण; रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजते वाटवाणी यांची उपस्थिती

नेरळ : रायगड माझा वृत्त 

नेरळ येथील हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी आपल्या देशाचा स्वातंत्रदिन साजरा केला जाणार आहे.15 ऑगस्ट रोजी पहिल्या प्रहरी कर्जत-कल्याण राज्यमार्ग आणि नेरळ-माथेरान रस्त्यावर हुतात्मा चौकात रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2018चे विजेते मानसोपचार तज्ञ डॉ भरत वाटवाणी यांच्या हस्ते तिरंगा फडकविला जाणार आहे.

2005 पासून नेरळ येथील हुतात्मा चौकात आपल्या देशाचा स्वातंत्रदिन 14 ऑगस्ट च्या मध्यरात्री मशाल फेरी काढून आणि 15 ऑगस्टच्या पहिल्या प्रहरी म्हणजे 12 वाजून 1 मिनिटांनी तिरंगा झेंडा फडकवून साजरा केला जातो.रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लबचा उपक्रम असलेल्या हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने नेरळ गावात मशालफेरी काढली जाते.तर 15 ऑगस्ट या दिवसाची सुरुवात होताच तिरंगा झेंडा शेकडो देशप्रेमी तरुणांच्या उपस्थितीत फडकविला जातो.
दरम्यान या कार्यक्रमात नेरळ परिसरात दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो. यावर्षी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानसोपचार तज्ञ आणि ज्यांना नुकताच प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे अवॉर्ड जाहीर झाला आहे ,ते डॉ. भरत वाटवाणी यांच्या हस्ते तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे.
नेरळ गावातून दहावीच्या परीक्षेत पहिली आलेली नेरळ विद्या विकास शाळेची वृष्टी मिलिंद साने या विद्यार्थिनीचा सत्कार केला जाणार आहे.सर्व तरुणांनी मध्यरात्री होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन हुतात्मा स्मारक समितीने केले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत